जीवनात यश मिळवण्यासाठी सर्व कामामध्ये चांगल्या नियोजनाची गरज असते.
आर्थिक नियोजन 2022
आपण व आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपले आर्थिक नियोजन खूप महत्वाचे आहे.यांमध्ये पुढील ४ बाबी असणे आत्यावश्यक आहे.
1) Term Life Insurance
टर्म इन्शुरन्स विमाधारकाला कमी प्रीमियममध्ये जास्त रक्कमेचे जीवन संरक्षण प्रदान करतो. घरातील प्रमुख कमावती व्यक्तीचा टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance) असावा.
आपत्कालीन निधी म्हणजे अशी रक्कम की जी आपल्याला अडचणीच्या वेळेस लगेच उपलब्ध होईल. आपत्कालीन निधी रक्कम आपल्या मासिक खर्चाच्या किमान १० पट असणे आवश्यक आहे.
आर्थिक नियोजना मधील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे investment होय. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग Invest करणे फार महत्वाचे आहे.
– जीवन विमा (Term Life Insurance)– आरोग्य विमा (Health Insurance)– आपत्कालीन निधी ( Emergency Fund)– गुंतवणूक ( Investment)