भारतातील Best 3 stock brokers ची माहिती या लेखात पाहणार आहोत. तुम्ही share market मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या कडे Demat account असणे आवश्यक आहे. हे Demat account आपण या Best 3 stock brokers मार्फत उघडू शकता. या लेखात आपण stock broker म्हणजे काय? Best 3 stock brokers कोणते? या सर्व ब्रोकर मार्फत आकारले जाणारे चार्जेस यांची तुलना करणार आहोत.
Stock brokers म्हणजे काय?
कोणत्याही listed कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री BSE ( Bombay Stock Exchange) व NSE (National Stock Exchange of India Ltd) या एक्सचेंजद्वारे केली जाते. परंतु, कोणताही गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंजमध्ये थेट व्यवहार करू शकत नाही. स्टॉकची खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला मध्यस्थ (broker) ची आवश्यक आहे. जो तुम्हाला या व्यवहारात मदत करेल. हा मध्यस्थ एक व्यक्ती किंवा कंपनी असते.
कोणताही गुंतवणूकदार ब्रोकरशिवाय शेअर बाजारात आपला व्यवहार करू शकत नाही. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला Demat Account आणि Treading Account आवश्यक आहे. ही दोन्ही खाती फक्त स्टॉक ब्रोकर मार्फत उघडू शकतो. कोणत्याही गुंतवणूकदाराच्या खरेदी-विक्रीच्या ऑर्डर स्टॉक एक्सचेंजला पोहोचवण्याचे काम Stock brokers करतात. थोडक्यात स्टॉक ब्रोकर share बाजार आणि गुंतवणूकदार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतो. म्हणून, स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला भारतातील best stock brokers जाणून घ्यावे लागतील.
Stock brokers कोणकोणत्या सुविधा पुरवतो?
Stock brokers खालील सुविधा देतात?
- Stock एक्सचेंज वर shares ची खरेदी विक्री करणे.
- commodity market मध्ये खरेदी विक्री करणे.
- बाजारात आलेल्या IPO साठी अर्ज करणे.
- Mutual Fund खरेदी करणे.
Term insurance च्या अधिक माहितीसाठी click Here.
स्टॉक ब्रोकर किती शुल्क आकारतो?
कोणताही stock broker या सर्व सुविधा देण्यासाठी काही फी आकारतो. वार्षिक खाते देखभाल शुल्क सुद्धा आकारते. स्टॉक ब्रोकर तुमच्याकडून प्रत्येक ऑर्डरसाठी एक निश्चित शुल्क आकारतो ज्याला ब्रोकरेज म्हणतात. मित्रांनो, प्रत्येक स्टॉक ब्रोकरचे ब्रोकरेज वेगवेगळे असते. तो किती ब्रोकरेज घेतो हे तुमच्या स्टॉक ब्रोकरवर अवलंबून आहे. या सर्व शुल्काबाबत आपण तुलनात्मक माहिती घेणार आहोत.
Health life Insurance बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
Best 3 stock brokers | Best 3 stock brokers in India

जे आपली share मार्केट मध्ये सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी Zerodha, Angle One व upstox हे ब्रोकर उत्तम आहेत. भारतामध्ये सध्या हे Best 3 stock brokers आहेत. सर्वात जास्त युजर हे या तिघाकडे आहेत. कारण यांची सेवा चांगली आहे व शुल्कही तुलनेने कमी आहे. यांचे app हे वापरण्यासाठी सोपे आहे. या तिघांची सर्व मुद्देनिहाय माहिती घेऊ. म्हणजे तुमच्यासाठी योग्य ब्रोकर तुम्हाला निवडता येईल.
निकष | Zerodha | Angle One | upstox |
Account opening charges | ₹ 200 | Free | Free |
Account maintenance charges( AMC) | ₹300/year + GST | Zero AMC charges For First Year ₹240/year + GST | 0 |
Equity delivery Brokerage | Zero Brokerage | Zero Brokerage | ₹20 or 2.5% whichever is lower |
Equity intraday Brokerage | 0.03% or Rs. 20/executed order whichever is lower | Flat Rs. 20 or 0.25% (whichever is lower) | ₹20 per executed order or 0.05% (whichever is lower) |
Equity futures Brokerage | 0.03% or Rs. 20/executed order whichever is lower | Flat Rs. 20 or 0.25% (whichever is lower) | ₹20 per executed order or 0.05% (whichever is lower) |
Equity options Brokerage | Flat Rs. 20 per executed order | Flat Rs. 20 or 0.25% (whichever is lower) | Flat ₹20 per executed order. |
Can we apply for IPO? | yes | yes | yes |
mobile app मधून trading करू शकतो का ? | होय Kite App | होय Angle One App | होय upstox App |
Mutual Fund खरेदी करू शकतो का? | होय | होय | होय |
Open an Account | Open an Account | Open an Account |

Zerodha, Angle One, upstox हे सध्याचे best 3 stock broker आहेत. वरील तक्त्याच्या सहाय्याने आपण आपल्यासाठी best broker निवडू शकता. यामध्ये अकाउंट ओपनिंग चार्जेसची तुलना केल्यास, आपल्याला zerotha मध्ये दोनशे रुपये अकाऊंट ओपनिंग चार्जेस लागतात तर इतर दोन मध्ये कोणतेही चार्जेस नाहीत. यामध्ये दरवेळी बदल होत असतो.
Account maintenance charges( AMC) Zerodha मध्ये प्रति वर्षे 300 रुपये, एंजल ब्रोकिंग मध्ये 240 रुपये आहेत व Upstox मध्ये कोणतेही चार्जेस नाहीत. या ठिकाणी आपल्याला Upstox बेस्ट वाटतो.
डिलिव्हरी चार्जेस ब्रोकरेज मध्ये Angle One व Zerodha मध्ये शून्य चार्जेस आहेत. तर Upstox मध्ये प्रति ट्रेड वीस रुपये किंवा 2.5% यापैकी कमी असेल ते चार्जेस आहेत. तसेच इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सर्वात कमी चार्जेस Zerodha मध्ये आहेत. अशाप्रकारे आपण तुलना केल्यास Zerodha मध्ये अकाउंट ओपनिंग चार्जेस असले तरी आपण जर दैनंदिन ट्रेडिंग करणार असा तर Zerodha मध्ये आपला सर्वात कमी चार्जेस लागतील. आपल्या गरजेनुसार यापैकी कोणताही एक stock broker निवडू शकता.